Thursday, August 13, 2020

पार्ले येथील विलीगिकरण कक्षातील रुग्णांचे अक्षरशः हाल सुरू आहेत ... प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष?

कराड
शहरापासून अगदी जवळच्या अंतरावर असणाऱ्या बनवडी पार्ले येथील  विलीगीकरण कक्षात ऍडमिट असणाऱ्या रुग्णांचे अक्षरशः हाल सुरू आहेत.औषधें,नाश्ता, जेवण या बाबीदेखील या कक्षामधून रुग्णाना वेळेवर मिळत नसल्याचे समजते. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
कराड शहरापासून काही अंतरावर बनवडी पार्ले याठिकाणी प्रशासनाने विलीगिकरण कक्षाची निर्मिती केली आहे.त्याठिकाणी सध्या अनेक पेशंट ऍडमिट आहेत.तेथे असणाऱ्या रुग्णांचे सध्या खूप हाल होत आहेत,आणि प्रशासनाचे अजिबात लक्ष नसल्याने त्या रुग्णांना कोणी वाली आहे का? असाच सध्या सवाल आहे...
सध्या कोरोनाच्या संकटाने शहर व परिसर पुरत्या भयभीत अवस्थेत आहे.असे असताना हा वाढता आजार कधी  संपुष्टात येईल याच विचारात प्रत्येक जण आपला दिवस व्यथित करताना दिसतोय.त्यातच वाढते पेशंट व त्यामुळे फुल्ल झालेली येथील रुग्णालये ही बाब सध्या चिंतेत भर टाकणारी असतानाच पारले येथील विलीगिकरण कक्षातील चालू असणाऱ्या भोंगळ आणि संतापजनक कारभाराचीदेखील सध्या जोरदार चर्चा आहे.
पार्ले येथील विलीगिकरण कक्षात काही वृद्ध महिला, व आसपास भागातून ऍडमिट असणारे पेशंट आहेत त्यांना दोन वेळच जेवण वेळेवर मिळत नाहीये,आणी जे दिले जातंय,ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तेथील रुग्णाच्या तक्रारी आहेत.या रुग्णांना रोज गरम पाणी प्यायला द्यावे लागते तेही त्यांना दिले जात नाही.तेथील ऍडमिट पेशंट कित्येक दिवस बिनआंघोळीच्या अवस्थेत आहेत.त्यांना आंघोळीला गरम पाणीदेखील त्या ठिकाणी दिले गेलेले नाही. त्यांना नाश्ताही  दिला जात नाहीये,जेवण उशिरा व निकृष्ठ दर्जाचे दिले जातंय.या रुग्णांनी काही खाण्यापिण्यासाठी मागितले तर,तेथील स्टाफ त्या रुग्णांच्या अंगावर खेकसतोय, तुसड्या पणाची वागणूक देतोय, सरळ बोलत नाही,अशाही तेथील तक्रारी आहेत.
या एकूणच प्रकाराकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करून तेथील चाललेल्या कारभाराला खतपाणीच घालत असल्याचे निदर्शनास येतय याचे आसचर्य आहे. काही सामाजिक संघटना पार्ले कक्षात चाललेल्या या सर्व प्रकाराविरोधात आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment