कराड
भाजपाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी गणेश उत्सवासाठी "बाप्पा आपल्या दारी' ही अभिनव कल्पना भक्तांसाठी आणली आहे.विक्रम पावसकर मित्र मंडळातर्फे गणेश मूर्ती आपल्याला घरपोच मिळणार आहे.कोरोनाच्या पार्शवभूमीवर गर्दीचा लोकांना धोका होऊ नये यासाठी ही कल्पना साकारली जाणार आहे.ज्यांना गणपती घरपोच हवे असतील त्यांनी त्यांचे बंधू अजय पावसकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विक्रम पावसकर हे नेहमीच सामाजिक कार्यात शहरातून अग्रेसर दिसतात. मागील लॉक डाऊन काळात त्यांनी मोठं काम केलं आहे.गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप,भाजीपाला वाटप,पी पी इ किट चे वाटप,प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी समाजासाठी या कोरोना काळात राबवले.
त्यांनी सध्या "बाप्पा आपल्या दारी' ही अभिनव कल्पना गणेश उत्सवाच्या पार्शवभूमीवर कराडकरांसाठी आणली आहे.कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता लोकांना गर्दीमुळे याचा धोका होऊ नये त्यासाठी गर्दीत जाणेचे टाळून गणपती मूर्ती आपल्याला घरपोच करण्याची व्यवस्था विक्रम पावसकर मित्र परिवाराने करण्याचे योजले आहे.म्हणून ज्यांना गणपती घरपोच हवे असतील त्यांनी त्यांचे बंधू अजय पावसकर यांच्याशी 7020338856 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.
विक्रम पावसकर हे ग्राउंडवर उतरून काम करणारे कार्यकर्ते म्हणून शहरात परिचित आहेत,त्यामुळे त्यांना लोकांच्या नेमक्या काय अडचणी आहेत हे चांगलेच माहीत आहे आणि म्हणूनच कोरोनाचे संकट शहरावर असताना आज पुन्हा गणेश उत्सवाच्या निमित्ताने ते लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
No comments:
Post a Comment