राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोविड – 19 ची लागण झाल्याने त्यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज कृष्णा हॉस्पिटलला भेट देत ना. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, पालकमंत्र्यांचे चिरंजीव जशराज पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून, हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले स्वत: त्यांच्या उपचाराकडे लक्ष ठेऊन असून, चिंता करण्याची काळजी नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी यावेळी दिली.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ना. कदम म्हणाले, की गेले २ दिवस मी फोनवरून सहकारमंत्र्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो. पण आज कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष येऊन मी डॉ. अतुलबाबा आणि विनायक भोसले यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय व डॉक्टरांशी चर्चा केली आहे. मला सांगायला आनंद वाटतो, की सहकारमंत्र्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. डॉक्टर्स चांगले काम करतायत. ते लवकरच बरे होऊन राज्याचे सहकारमंत्री आणि सातारचे पालकमंत्री या नात्याने पुन्हा कार्यरत होतील, असा मला विश्वास वाटतो.
No comments:
Post a Comment