Monday, August 24, 2020

"कृष्णा' मधून आत्तापर्यंत 900 हुन अधिक जण झाले कोरोनामुक्त...आज 24 जणांना दिला डिस्चार्ज...

कराड
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 24 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये मारुल हवेली पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, येडेमच्छिन्द्र येथील 53 वर्षीय पुरुष, चोरे येथील 87 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 26 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय मुलगी, 3 वर्षीय मुलगा, वेळनेश्वर भाटी गुहागर येथील 65 वर्षीय पुरुष, सैदापुर येथील 37 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड येथील 27 वर्षीय पुरुष, कासेगाव येथील 21 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कोल्हापूर येथील 14 वर्षीय मुलगा, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, ओंड येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 24 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 21 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, चिपळूण येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील 69 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment