कराड-
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी कराड शहराचा अववल क्रमांक आला आहे. याबद्दल सर्व कराड शहरवासियांचे कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले आहेत व सर्व जनतेचे अभिनंदनही केले आहे.
कराड नगरपरिषदेचे प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करणारे सर्व कर्मचारी, तसेच नगरपरिषदेचे सर्व आधिकारी, सर्व पदाधिकारी समित्यांचे सभापती, नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष याचेसहित सर्व नगरसेवक ,नगरसेविका,मुख्याधिकारी, शहरातील सर्व सामाजिक संस्था,व्यक्ती, स्वच्छता दुत, व सर्व प्रभागातील सर्व सुजाण अबालवृद्ध नागरिक, बंधू भगिनी या सर्वांचा या यशामध्ये सिहाचा वाटा आहे.
सर्वांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी कराड शहराला मिळाला आहे ही अभिमानाची बाब आहे असेही त्यांनी म्हटले आहे .
No comments:
Post a Comment