Wednesday, August 26, 2020

ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका लवकरच होणार सुरू ; 10 ते 12 व्हेंटिलेटरची आमदार पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून होणार उपलब्धता ; नगरसेवक अप्पा माने,इंद्रजित गुजर यांची माहिती ;

कराड
येथील नगरसेवक राजेंद्र उर्फ अप्पा माने,इंद्रजित गुजर व फारूक पटवेकर यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ऑक्सिजन युक्त अम्ब्युलन्स शहरातील कोविड रुग्णांसाठी  उपलब्ध करून देण्याबाबतबाबत मागणी केली आहे.येथील नगरपरिषदेने देखील या मागणीचा पाठपुरावा करून सदर अम्ब्युलन्स कराडकरांसाठी उपलब्ध करून त्वरित घेतली पाहिजे,यासाठी मुख्याधिकारी डाके याना निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान कराड शहरातील कोविड रुग्णांसाठी 10 ते 12 व्हेंटिलेटरची उपलब्धता करून घेण्यासाठी नगरसेवक गुजर ,व माने ,पटवेकर यांचा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे पाठपुरावा सुरू आहे.

सध्या कोरोनाचा कहर सम्पूर्ण शहरात वाढल्याचे चित्र आहे.त्यातच फुल्ल झालेली रुग्णालयामुळे पेशंटना घरात राहूनच उपचार घेण्याची वेळ आली आहे.मात्र एखाद्या पेशंट ची तब्बेत खूप बिघडली तर मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.हॉस्पिटल मिळाले तरी व्हेंटिलेटरची कमतरता भासल्याच्या कारणाने अनेक रुग्णाचे मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना सध्या घडताना दिसत आहेत.
येथील शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक अप्पा माने,  तसेच इंद्रजित गुजर व फारूक पटवेकर यांनी शहरातील व्हेंटिलेटर च्या कमतरतेला दूर करण्यासाठी प्रयत्न म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे 10 ते 12 व्हेंटिलेटरची उपलब्धता आपल्या भागाकरिता व्हावी अशी मागणी केली आहे.त्याबाबत लवकरच आमलबजावणी होऊन रुग्ण सेवेसाठी व्हेंटिलेतर उपलब्ध होतील असे या नगरसेवकांनी सांगितले,तसेच येथील रुग्णांसाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची देखील आ.पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे मागणी केली आहे,जेणेकरून रुग्णांना ऍडमिट करतानाच आवश्यकता भासल्यास  रुग्णवाहिकेमधूनच ऑक्सिजन चा पुरवठा करता येईल व त्या रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होईल म्हणून सदर रुग्णवाहिकेची मागणी केली आहे. ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका लवकरच शहरातील रुग्णांच्या सेवेत दाखल करणार असल्याचेही या नगरसेवकांनी सांगितले.येथील पालिकेच्या वतीनेदेखील यासाठी पाठपुरावा करावा यासाठी नुकतेच येथील मुख्याधिकारी डाके याना याबाबत निवेदन  देण्यात आले आहे. या नगरसेवकांच्या लोकांसाठी चाललेल्या धडपडीचे शहरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment