सातारा दि.14 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार जिल्ह्यातील 37 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 247 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असून 434 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोनाबाधित अहवालामध्ये *महाबळेश्वर तालुक्यातील* भेकवली 1, महाबळेश्वर 13, राजणवाडी 1, तापोळा 1.,
*कराड तालुक्यातील* कोळे 1.,
*वाई तालुक्यातील* कन्हुर 1,
*खटाव तालुक्यातील* गुरसाळे 1.,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2.,
*माण तालुक्यातील* म्हसवड 1.,
*खंडाळा तालुक्यातील* पळशी 3, खंडाळा 2, नायगाव 4, शिरवळ 4.,
*जावळी तालुक्यातील* नेवेकरवाडी 2 नागरिकांचा समावेश आहे.,
*_247 नागरिकांना आज डिस्चार्ज.._*
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 64, खंडाळा तालुक्यातील 30, खटाव तालुक्यातील 16, कोरेगांव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 29, सातारा तालुक्यातील 28, वाई तालुक्यातील 51 नागरिकांचा समावेश आहे.
*_ 434 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.._*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 13, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12, वाई येथील 44, शिरवळ 40, रायगाव 45, पानमळेवाडी येथील 57, महाबळेश्वर येथील 65, खावली 85, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 73 असे एकूण 434 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 35875
एकूण बाधित -- 7129
घरी सोडण्यात आलेले -- 3644
मृत्यू -- 226
उपचारार्थ रुग्ण -- 3259
000
No comments:
Post a Comment