Friday, August 7, 2020

आता...श्री शिवाजी हायस्कुल येथे होणार अँटिजेंन टेस्ट...नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिली माहिती


कराड-येथील श्री शिवाजी हायस्कुल येथे आता अँटिजेंन टेस्टची सुविधा लवकरच सुरू होणार आहे.सम्पूर्ण शहर व परिसरातील लोकांना या टेस्टकरिता मध्यवर्ती ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सदर हायस्कुलची उपलब्धता होत असल्याचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी सांगितले.

कराड नगरपालिकेच्या वतीने येथील टिळक हायस्कूल येथे अँटीजेन टेस्ट सूरू आहेत. आज लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील,नियोजन सभापती विजय वाटेगावकर , शिवाजी पवार तात्या, जयंत बेडेकर दादा, मोहसीन अंबेकरी, व मूख्याधिकारी रमाकांत डाके यांनी एकत्रितपणे संबंधित केंद्रास भेट दिली.त्यावेळी शहर व परिसरातून स्वॅब देण्यासाठी येणार्या नागरीकांसाठी आणखी एखादया मध्यवर्ती ठिकाणची व्यवस्था करता येईल का ? याबाबत या सर्वांमध्ये चर्चा होऊन येथील श्री शिवाजी हायस्कुल येथे ही व्यवस्था होऊ शकते या विषयावर एकमत झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांना नगरसेवक सौरभ पाटील व शिवाजी पवार तात्या यांनी त्याचवेळी त्वरित संपर्क केला, व याविषयी त्यांच्याशी चर्चादेखील केली. कोव्हिड संदर्भात कोणतीही बाब असूदे, श्री शिवाजी शिक्षण संस्था कराड नगरपालिकेस व शासनास संपूर्ण सहकार्य करेल असे संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचवेळी सांगून टाकले. शिवाजी हायस्कूल ची इमारत अँटिजेंन टेस्टसाठी उपलब्ध करून देण्यास परवानगीदेखील त्यांनी त्याचवेळी दिली अशी माहिती नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनावर सदर टेस्ट करण्याकरिता येणाऱ्या लोकांच्या गर्दीचा अनावश्यक ताण पडणार नाही.शिवाय टेस्ट करायला आलेल्या व्यक्तीची टेस्ट त्वरित होऊन त्यांचाही वेळ वाचणार आहे.आणि महत्वाचे म्हणजे एक जागा आणखी उपलब्ध झाल्याने वैद्यकीय क्षेत्रावरदेखील या कामासंदर्भात अतिरिक्त ताण येणार नाही, असा त्रिसूत्री फायदा या शाळेच्या उपलब्धतेमुळे होणार आहे. त्याद्रीष्टीने अँटीजेन टेस्ट श्री शिवाजी हायस्कूल येथे लवकरात लवकर सूरू करण्याबाबतचे नियोजन सध्या पालिकेच्यावतीने सुरू असल्याचेही नगरसेवक सौरभ पाटील यांनी सांगितले.
  

No comments:

Post a Comment