Saturday, August 1, 2020

48 जणांना दिला डिस्चार्ज ; 559 जणांचे नमुने पाठवले तपासणीला ; दोघांचा मृत्यु


  सातारा दि. 1 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 559 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 33 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी असता ते कोरोनाबाधित असल्याची कळविले आहेत. तसेच वाई व सातारा तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

*घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये*

*महाबळेश्वर* तालुक्यातील  गोडवली येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला,
*खंडाळा*  तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष,
*सातारा* तालुक्यातील    जिहे येथील 70 वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील  39,48,41 वर्षीय महिला 42 वर्षीय पुरुष,  वेंकटपुरा पेठ येथील 64 वर्षीय महिला, कारंडी येथील 65 वर्षीय महिला, देगाव फाटा येथील 34 वर्षीय महिला, गजेगाव येथील 25 वर्षीय महिला, कण्हेर येथील  65 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, तामजाई नगर येथील 5 वर्षीय बालीका,  सदरबझार येथील 21,27,30,25 वर्षीय पुरुष व 40,43 वर्षीय महिला, नवीन एमआयडीसी येथील 2 वर्षीय बालीका, शिवनगर एमआयडीसी येथील 58,30, 28,45 वर्षीय पुरुष 13 वर्षीय बालक व 25,55 वर्षीय महिला, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष,
*कोरेगांव* तालुक्यातील कालवडी येथील 55 वर्षीय महिला,
*कराड* तालुक्यातील   वान्याचीवाडी  येथील 62 वर्षीय महिला, मिरगाव येथील 31 वर्षीय महलिा, मलकापूर येथील 32,24 वर्षीय पुरुष, किवळ येथील 69 वर्षीय पुरुष,  कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय डॉक्टर 31 वर्षीय महिला,  टेंभू येथील 40 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 61 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 31 वर्षीय महिला,
*पाटण* तालुक्यातील महिंद येथील 58 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय पुरुष, कालगांव येथील 20 वर्षीय तरुणी, खाले येथील 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय तरुण,
*वाई*  तालुक्यातील  दत्त नगर येथील 32 वर्षीय पुरुष, शेंदुर्जणे येथील 40 वर्षीय पुरुष.

*559 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  41,  कोरेगांव येथील 22, वाई येथील 22, खंडाळा येथील 95, रायगाव 30, पानमळेवाडी 96, मायणी 58,  व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 86 असे एकूण  559 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.
*खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 33 रुग्ण कोरोनाबाधित पैकी 2 जणांचा मृत्यू*
सातारा जिल्ह्यातील विविध खाजगी  रुग्णालयात दाखल असलेल्या 33 रुग्णांचे ( यामध्ये शिरवळ  येथील 21, खंडाळा येथील 2, सातारा येथील व्यंकटपुरा 1, निगडी 1, ग्रीनसीटी भूविकास बँक 1, अंगापूर 1, त्रिमर्ती मंगल कार्यालय 1, कारी 1, दंगाव शिरगाव 1 ( सकाळी 1 मृत व्यक्तीचा व आत्ताच्या 2 मृत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे ) खाजगी प्रयोगशाळेत  तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचे कळविले आहे. यामध्ये सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये परखंदी, ता. वाई येथील 81 वर्षीय महिला व गोडोली ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

घेतलेले एकूण नमुने 29042
एकूण बाधित 4083
घरी सोडण्यात आलेले 2084
मृत्यू 136
उपचारार्थ रुग्ण 1863
  00000

No comments:

Post a Comment