Sunday, August 16, 2020

शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कराड पालिकेकडून उपाययोजना सुरू ; नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिली माहिती

कराड
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोयना नदीच्या खोर्यात पावसाचा वाढलेला जोर पहाता कराड शहर व पूढे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये भविष्यात पूरसदृश्य परीस्थिती निर्माण होऊ  शकते हे लक्षात घेऊन येथील नगरपालिकेच्या वतीने संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे अशी माहिती नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिली.
   काल सोमवारी रात्री याच अनूषंगाने पहाणी करण्यासाठी लोकशाही आघाडीचे गटनेते श्री सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक श्री फारूख भाई पटवेकर, सभापती श्री हणमंतराव पवार, मा. सभापती  श्री विजय वाटेगावकर भाऊ, सामाजिक कार्यकर्ते श्री जयंत बेडेकर आदी सर्वजण येथील  घाट परिसरामध्ये उपस्थित राहिले होते.
    याप्रसंगी कराडचे पोलीस ऊपाधिक्षक  सूरज गूरव, शहर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  बी. आर. पाटील यांच्यासमवेत या लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. मागील वर्षी आलेल्या पूराचा अनुभव लक्षात घेऊन आता तशी परिस्थिती होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबत चर्चा झाली. पोलीस दल यावर्षी कोणत्याही परीस्थितीला तोंड देण्यासाठी नियोजनबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
    पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन या परीस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहे. कराड शहरालगत नदी किनारी राहणार्या लोकांना पालिकेच्या शाळांमध्ये शिफ्ट करणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथे एका खोलीत एकच कूटूंब ठेवणे आदी सर्व नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे असेही माहिती नगरसेवक सौरभ पाटील म्हणाले.
    

No comments:

Post a Comment