Sunday, August 16, 2020

जिल्ह्यात 28 जण सापडले बाधित, तर 296 जण झाले बरे... घरी परतले..

सातारा दि.16 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार जिल्ह्यातील 28  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  296  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असून 140 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
कोरोनाबाधित अहवालामध्ये *महाबळेश्वर तालुक्यातील*  महाबळेश्वर शहरातील गवळी मोहल्ला 1,नगरपालिका 4, महाबळेश्वर 1, स्कूल मोहल्ला महाबळेश्वर 1, मेटगुताड 2., 

*कराड तालुक्यातील*    शिंगणवाडी 1

 *फलटण तालुक्यातील*   मारवाड पेठ 5, मंगळवार पेठ 3, मलवडी 1, मुंजवडी 1, मुरुम 1,  नांदल 1, आदर्की 2,  रविवार पेठ 1, बिरदेवनगर 1, शुक्रवार पेठ 2नागरिकांचा समावेश आहे.

*_296 नागरिकांना आज डिस्चार्ज.._*
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 51, खंडाळा तालुक्यातील 26, खटाव तालुक्यातील 27, कोरेगांव तालुक्यातील 45, महाबळेश्वर तालुक्यातील 8, माण 1, पाटण तालुक्यातील 21, फलटण तालुक्यातील 24, सातारा तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 53 नागरिकांचा समावेश आहे. 

*_140 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.._*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 55, फलटण 15, पानमळेवाडी 8, महाबळेश्वर 5, मायणी 57 असे एकूण 140 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने                              -- 36015
एकूण बाधित                                       --   7371
घरी सोडण्यात आलेले                           --   3940
मृत्यू                                                   --     242
उपचारार्थ रुग्ण                                     --   3189
000

No comments:

Post a Comment