कराड
सद्यस्थितीत कराड शहरात कोविड पेशंटची होणारी वाढ ही खरोखरच चिंताजनक आहे.अशातच येथील हॉस्पिटल रुग्णांनी फुल्ल झाली आहेत.अनेकजणांना ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. येथील समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था यांचेवतीने याचेच भान ठेवून पोर्टेबल ऑक्सिजन मशीन आणले आहे.याचा उपयोग शहरातील सर्वच गरजू रुग्णांसाठी होणार असल्याचे संस्थेचे सचिव ओंकार आपटे यांनी सांगितले.
सध्या शहरातून कोरोना पेशंट ची आकडेबारी फारच वाढत असल्याचे चित्र आहे.प्रशासन त्यांच्या लेव्हलवर आपलं काम करत आहे.शहरातील हॉस्पिटल्स कोविड रुग्णांनी फुल्ल झाली आहेत.त्यामुळे आता रुग्णांना बेड मिळत नाहीये, आणि म्हणून अनेकजण आपआपल्या घरी उपचार घेत आहेत. श्वासाचा त्रास असणारे रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मृत्यू पडत असल्याचे भयानक वास्तव सध्या इथे आहे. म्हणजे एखादा हॉस्पिटलमध्ये असेल तरी त्याला व्हेंटिलेटर लवकर मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे.या साठी अनेक सामाजिक संस्था ऑक्सिजन मशीन उपलब्ध करत आहेत,जेणेकरून त्याच्या अभावी रुग्ण दगावू नये.येथील समस्त ब्राह्मण सामाजिक संस्थेच्या वतीने देखील सामाजिक भावनेतून शहरातील गरजू कोविड रुग्णांना ऑक्सिजन अभावी कोणताही त्रास होऊ नये यासाठी ऑक्सिजन मशीनची उपलब्धता केली आहे. या करिता समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी आपले सर्वतोपरी योगदान देत आपली बांधीलकी जपत माणुसकीचे दर्शन दिले आहे.ज्या रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासत असेल, त्यांनी संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर, सचिव ओंकार आपटे यांच्याशी अनुक्रमे 9422039777 आणि 7020644141 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सचिव ओंकार आपटे यांनी केले आहे.सर्वच स्तरातून या लोकपयोगी उपक्रमाचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment