Monday, August 24, 2020

जिल्ह्यातील 240 जणांना आज दिला डिस्चार्ज...

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 240 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 800 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान अगोदर 290,परवा 342, काल 157 आणि आज 240 इतक्या लोकांना डिस्चार्ज देऊन या चार दिवसात घरी सोडण्यात आले . कोरोनामुक्त होणारा आकडाही यानिमित्ताने वाढताना दिसतोय.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये *कराड*तालुक्यातील 42, *खंडाळा* तालुक्यातील 11, *खटाव* तालुक्यातील 9, *कोरेगाव* तालुक्यातील 18, *महाबळेश्वर* तालुक्यातील 4, *पाटण* तालुक्यातील 6,  *सातारा* तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 26  व इतर 89 असे एकूण 240 नागरिकांचा समावेश आहे.
*800 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8,  कराड 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण 78, कोरेगाव 53, वाई 104, खंडाळा 99, रायगांव 54,  पानमळेवाडी 82, मायणी 32, महाबळेश्वर 45, पाटण 28, दहिवडी 32 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 104 असे एकूण 800 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment