Thursday, August 13, 2020

आज 208 नागरिक बरे होऊन घरी परतले...

सातारा दि.13 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 208    नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले  तर 574 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 11, *कराड* तालुक्यातील 57, *खंडाळा* तालुक्यातील 24,*खटाव* तालुक्यातील 7, *कोरेगांव* तालुक्यातील 26, *महाबळेश्वर* तालुक्यातील 5, *माण* तालुक्यातील 3, *पाटण* तालुक्यातील  3, *फलटण* तालुक्यातील 25, *सातारा* तालुक्यातील 26, *वाई* तालुक्यातील 21  असे एकूण 208 नागरिकांचा समावेश आहे.  
*574 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 93, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 32, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 53, वाई येथील 76, शिरवळ 29,  रायगाव 20,  पानमळेवाडी येथील 68, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 90,  खावली 12, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 48 असे एकूण 574 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 34728
एकूण बाधित -- 6504
घरी सोडण्यात आलेले --- 3101
मृत्यू -- 206
उपचारार्थ रुग्ण -- 3197
000

No comments:

Post a Comment