Sunday, August 16, 2020

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तब्बेतीची गृहराज्यमंत्री ना.देसाई यांनी केली चौकशी

कराड
राज्याचे सहकारमंत्री आणि सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने त्यांना कृष्णा हॉस्पीटल कराड येथे उपचाराकरीता ॲडमिट करण्यात आले आहे. त्यांच्या भेटीकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे आज कृष्णा हॉस्पीटल येथे आले होते.परंतू त्यांना प्रत्यक्ष भेटता न आल्याने ना.शंभूराज देसाईंनी पालकमंत्री यांच्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर तसेच पालकमंत्री यांचे चिरंजीव श्री.जशराजबाबा बाळासाहेब पाटील व बंधू श्री.जयंतकाका पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली व पालकमंत्री यांच्या तब्बेतीची विचारपुस केली.
पालकमंत्री उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून ॲडमिट केल्यापासून त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे उपचार करणारे डॉक्टर व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी यावेळी ना.देसाईंना सांगितले.चिंता करण्याचे कोणतेही कारण नसून त्यांची तब्बेत लवकरच बरी होवून कोरोना संसर्गापासून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

No comments:

Post a Comment