कराड
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील हे आज कोरोना मुक्तीनंतर मंगळवार पेठ कराड येथील मूळ घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले
यावेळी डॉ.दिनेश गायकवाड, प्रकाश पाटील(बापू), जयंत पाटील(काका), शौनक गायकवाड, पार्थेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना पाटील म्हणाले,प्रतिवर्षी प्रमाणे गणेशोत्सव हा संपूर्ण देशामध्ये साजरा होतोय परंतु यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठे संकट आहे. राज्य शासन, केंद्र शासन यांनी काही गाईडलाईन दिल्या त्याप्रमाणे सुरक्षित अंतर राखले पाहिजे, मास्क, हॅन्डग्लोज वापरले पाहिजे आशा सूचना दिल्या गेल्या त्याप्रमाणे हा सण साजरा होत आहे .मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाला परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठ्याप्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे.
आदरणीय शरद पवारसाहेबांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकार व पणन जबाबदारी दिली. यामध्ये काम करत असताना सातत्याने दक्षता घेण्याचा प्रयत्न केला पंरतु मलाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी त्यांनी उपचारासाठी मुंबईला शिफ्ट होण्याच्या सूचना केल्यानंतर मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेलते, कराड येथे जे उपचार चालू होते तेच मुंबई येथे देखील चालू ठेवले.आणि २१ तारखेला डिस्चार्ज भेटल्यानंत कराड आलो. नियमाप्रमाणे १४ दिवस झाले आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन, विसर्जन करावे या उद्देशाने मी मंगळवार पेठ कराड येथील मूळ घरी येऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
मी ऍडमिट असताना अनेकांनी फोन वरून विचारपूस केली, काही गावांमध्ये देवाला साकडे घालण्यात आले त्या सर्वांचे मी आभार मानतो. व सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोजचा वापर करावा याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व शुभेच्छा देतो राहिलेले गणेशोत्सवाचे दिवस, अनंत चतुर्थीचा दिवस, मोहरम हे सोशल डिस्टनसिंग पाळून पार पाडावे आणि येणाऱ्या काळामध्ये या संकटावर मात करावी असेही नामदार बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment