Tuesday, August 11, 2020

भाजपा नेते आशिष शेलार अचानक शरद पवारांच्या भेटीला ; खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विटर वरून दिली माहिती...

कराड
विशेषवृत्त
 राज्यात राजकीय घडामोडींना वेग धरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच परत येतील, असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीतच आज भाजपाचा राज्यातील एक बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार  यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार  यांची भेट घेतली. या भेटीची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून दिली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र आशिष शेलार यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट का घेतली असावी, असा प्रश्नही विचारला जात आहे. तसे शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

No comments:

Post a Comment