Sunday, June 6, 2021

1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 13(7875), कराड 209 (23494), खंडाळा 65 (10924), खटाव 177 (16886), कोरेगांव 126 (15108), माण 78 (11934), महाबळेश्वर 20 (4122), पाटण 102(7349), फलटण 35 (27107), सातारा 309 (36756), वाई 43 (11922) व इतर 11 (1113) असे आज अखेर  एकूण 174590 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (177), कराड 9 (678), खंडाळा 0 (139), खटाव 2 (430), कोरेगांव 2 (333), माण 5 (230), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (161), फलटण 3 (263), सातारा 11 (1096), वाई 2 (313) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3864 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

1 comment:

  1. Karad city che detils of covid19 pt count pan sanaga peth pramane

    ReplyDelete