सातारा दि.28 (जिमाका): कुपर कार्पोरेशन प्रा.लि यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी केलेल्या करारानुसार सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जनरेटर सेट बविण्याचे काम पूर्ण केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांच्याशी केलेल्या करारानुसार अगदी नाममात्र भाडे तत्वावर जनरेटर सेट बसवून प्रशासनाला मदत केली आहे. अजुनही 5 जनरेटर सेट बसविणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी शासकीय रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मेडिकल ऑक्सिजन निर्मिती होणार असून भविष्यात येणाऱ्या कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे संच कुपर कार्पोरेशन प्रा.लि. यांनी बसविले आहेत.
फारुख एन कुपर आणि कुपर कॉपरेशन प्रा लि. यांनी केलेल्या या कामाची सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उल्लेखनीय बाब असून भविष्यात अशीच भरीव मदतीची अपेक्षा आहे.
0 0 00
No comments:
Post a Comment