कराड-कराड दक्षिणचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद बोलावून कोविड च्या एकूणच परिस्थितीला मोदी जबाबदार असल्याची टीका केली मात्र पारनेरचे आमदार निलेश लंके व कोरेगावचे महेश शिंदे यांच्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात इतर लोकप्रतिनिधीना कोविडच्या या लाटेत म्हणावे असे का काम जमले नाही? अजितदादांना जिल्ह्यात कोविड कंट्रोल करण्याच्या नियोजनासाठी इकडे यावे लागले हे इथल्या राजकारण्याचे अपयश नाही का... या विषयावर ठोस उत्तर न देता अजितदादा पंजाबचे उपमुख्यमंत्री आहेत का? असे पत्रकारांनाच विचारत ते राज्याचे नेते आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्या जिल्ह्यात लक्ष घातले हे उलटपक्षी आपल्या जिल्ह्यासाठी चांगलेच आहे असे गुळगुळीत उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला... दरम्यान कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही मोहितेना एकत्र करण्यासाठी मी प्रयत्न करूनही त्यामध्ये मला अपयश आले अशी कबुली देत आपण या चर्चेमधून बाहेर पडलो आहोत असे स्पष्टपणे त्यांनी यावेळी सांगूनही टाकले...मात्र कोणत्या कारणाने दोन्ही मोहिते एकत्र आले नाहीत हे सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला...
आज केंद्र सरकारने इंधन दरवाढ केल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभर काँग्रेस ने आंदोलन केले त्याबद्दल बोलण्यासाठी आ प्रिथ्वीराजबाबा यांनी येथे पत्रकार परिषद बोलावली होती त्यावेळी ते बोलत होते...यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे कोबीड बद्दलचे धोरण पूर्णपणे चुकीचे आहे असे सांगत पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका केली व लसीकरणाच्या बाबतीत देशातील चाललेल्या घोळाला मोदीच जबाबदार असल्याचे ठासून सांगितले ...इंधन दरवाढिबाबतचे केंद्राचे धोरण चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले... याचवेळी त्यांनी कृष्णा कारखान्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या संबंधी काही प्रश्नावर देखील आपले मत मांडले
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहित्यांचे मनोमिलन होऊ शकले नाही याबाबत विस्तृत बोलताना "बाबा' म्हणाले... मागील दोन महिन्यांपासून यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीत दोन्ही मोहिते गटात आघाडी व्हावी म्हणून मी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. सभासदच आता निर्णय घेतील. मी आजपासून चर्चेत सहभागी होणार नाही ही माझी भूमिका आहे. मी अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना याबाबत सांगितले आहे. आपणास मानणाऱ्या पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते या दोन्ही गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आपण कोणती भूमिका घेणार ? याकडे लक्ष वेधले असता आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण यावर काही भाष्य करणार नाही. सभासदच योग्य तो निर्णय घेतील असे सांगत तर पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. आपण चर्चेतून बाहेर पडलो असलो तरी आघाडी होणार नाही असे मी सांगू शकत नाही. संबंधित लोक याबाबत निर्णय घेऊ शकतात, असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment