भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदा लादे यांच्या पुढाकाराने रोज शहरातील 350 गरीब गरजू लोकांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे शासनाच्या सहकार्याने व आदेशाने सदर उपक्रम राबवत असल्याचे लादे यांनी सांगितले या उपक्रमाचे कौतुक होत आहे...
सध्या कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने सर्वत्र लॉक डाऊन आहे त्यामुळे सर्व काम धंदे ठप्प आहेत ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे हाल सुरू आहेत त्यांच्या मदतीला भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदा लादे सरसावले आहेत... यांच्या पुढाकाराने जवळजवळ 350 गरीब व गरजू लोकांना रोज जेवण देण्यात देत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली शासनाच्या आदेशाने व सहकार्याने हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले...त्यासाठी समाजातील काही दानशूर व्यक्तींची मदत होत असल्याचेही ते म्हणाले
शिव भोजन आणण्यासाठी संध्याकाळी जे लोक येऊ शकत नाहीत त्यांना हे जेवण त्यांच्या जागेवर जाऊन पोच दिले जाते असेही त्यांनी सांगितले त्यांच्या या कार्याचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे
गरिबाला अन्नाचा घास भरवल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले
या कोरोना काळात लादे यांनी लोकांना विविध प्रकारचा मदतिचा हात देत आपली बांधिलकी जपली आहे
No comments:
Post a Comment