कराड
ऍड उदयसिह पाटील हे मला बंधुतुल्य आहेत. काँग्रेसचे ते नेते आहेत. त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जाहीर केलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र ती खेदजनक असल्याचे मत राज्याचे कृषी राज्य मंत्री ना.विश्वजीत कदम यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार आज पॅनल जाहीर झाली आहेत. ही निवडणूक तिरंगी होणार हेही आज स्पष्ट झाले आहे. त्याच पाश्वभूमीवर रयत पॅनलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना कदम बोलत होते.
यावेळी कृष्णेचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते, काँग्रेसचे मनोहर शिंदे,राजेंद्र यादव,पै.नाना पाटील, शिवराज मोरे यांचेसह परिसरातील अनेक काँग्रेसजन यावेळी उपस्थित होते.
ना.कदम पुढे म्हणाले, कृष्णेच्या शेतकरी सभासदांच्या उज्वल भवितव्यासाठी कारखान्याची उभारणी दिवंगत आदरणीय यशवंतराव मोहितेंच्या थोर विचाराने झाली. त्या विचारांची जोपासना करत इंद्रजीत मोहिते आपली वाटचाल करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने सभासदाना योग्य न्याय मिळेल आणि कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांचे राहणीमान उंचावेल त्यामुळे या निवडणुकीत रयत पॅनलच्या पाठीशी प्रत्येक शेतकरी सभासदाने मागे उभे राहिले पाहिजे यातूनच दिवंगत आदरणीय भाऊंच्या विचाराची खर्या अर्थाने जोपासना होणार आहे.
यावेळी इंद्रजित मोहिते म्हणाले मदनदादा मोहिते हे कारखान्याचे जाणते नेते आहेत. त्यांनीही कारखान्याचे नेतृत्व केले आहे. मागील वेळी ते आमच्याबरोबर होते आता ते आमच्याबरोबर नाहीत. ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. मात्र सर्वसामान्य शेतकरी आमच्या पाठीशी आहे.
अविनाश मोहितेंच्या ‘त्या’ 58 कोटीच्या कर्जाची आठवण करून देताना इंद्रजितबाबा म्हणाले ते कर्ज सामान्य शेतकर्यांच्या व तोडणी कामगारांच्यावर अन्याय आहे. तोडणी वाहतूकदाराना अडवणूक करून केलेली ही फसवणूक आहे.
अविनाश मोहितेंच्या काळात कारखान्याची झालेली दुरावस्था सांगणारा व्हीडिओ इंद्रजितबाबांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये...वर्षाला कामगारांना पगार दिल्याचे खोटे दाखवून 5 कोटींचा चुराडा केल्याचे त्यात म्हटले आहे 30 कोटीचा डिस्ट्रीलरीसाठी दाखवलेला एकूण हिशोब मिळत नाही. तांब्याचे असणारे कारखान्याचे भंगार त्यांच्या काळात विकले गेले.केवळ उधळपट्टी केली गेली. शेतकर्यांचे फंड त्याच काळात रोखण्यात आले. पगार उशिरा झाले. फरक देता आला नाही. बोनस उशिरा दिला.कारखाना विस्ताराचे नाटक केले गेले. दारू विक्रीचे कॉन्ट्रॅक्ट चुकीच्या लोकांना देऊन कारखान्याचे अतोनात नुकसान केले. उत्तम चाललेला कारखाना अडचणीत आणला. असे अनेक आरोप इंद्रजितबाबानी त्या व्हिडीओमध्ये केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा हे आरोप केवळ आरोप नाहीत, तर वस्तूस्थिती असल्याचा पुनरुच्चार केला.
No comments:
Post a Comment