Friday, June 25, 2021

चारचाकी वाहनासाठी MH 11- DA ही मालिका सुरु ;

सातारा दि. 25 (जि.मा.का.) : चारचाकी वाहनासाठी MH 11-DA  ही 1 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 29  जून 2021 रोजी  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येणार असून इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील तसेच चारचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद चव्हाण, यांनी कळविले आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ' प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'  या तत्वानुसार नोदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येतील.   अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.  आकर्षक नोंदणी क्रमांक संगणकीय वाहन 4.0 या प्रणालीवर देण्यात येत असल्यामुळे अर्जासोबत आधार कार्ड  ई-मेल आयडी,  मोबाईल नंबर,पिनकोड नंबर देणे बंधनकारक आहे.
एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे डीमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 30 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही श्री. चव्हाण, यांनी कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment