कराड
रोटरी क्लब ऑफ कराड व रत्ननिधी चारिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.रोटरी चे गव्हर्नर हरीश मोटवाणी यांच्या शुभहस्ते याचं वाटप करण्यात आले.
यावेळी क्लब प्रेसिडेंट रो. गजानन माने, सेक्रेटरी डॉ. रो. शेखर कोगणुळकर उपस्थित होते.
कोरोना चे सर्व नियम पाळून फक्त 5 शाळांना प्राथमिक स्वरूपात या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. व बाकीच्या इतर शाळांना ही पुस्तकं शाळांमध्ये पोच करण्यात येणार आहे.
कराड शहर व तालुक्यातील 123 शाळांमध्ये या पुस्तकाचं वाटप करण्यात आले
. एका शाळेमध्ये 70 संदर्भ पुस्तकांचा संच देण्यात आला. या पुस्तकांचा लाभ दर वर्षी सर्वसाधारण 33 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे .शालेय व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संदर्भ पुस्तकांची आवश्यकता असते यामध्ये या संदर्भ पुस्तकांची कमतरता रोटरी ने पूर्ण केली आहे, मुंबईच्या रत्न निधी चॕरीटेबल ट्रस्ट च्या सहकार्यातून 123 शाळा आणि महाविद्यालयांमधील ग्रंथालयांना ही पुस्तक भेट म्हणून देण्यात आली आहेत.
या संदर्भ पुस्तकांमध्ये इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी पुस्तक वाटप करण्यासाठी क्लब चे लिटरसी डायरेक्टर व प्रोजेक्ट चेअरमन रो. जगन पुरोहित, झोनल फंक्शन लिटरसी डायरेक्टर रो. किरण जाधव रो. धनंजय जाधव,रो. रो.राजू खलीपे, रो.प्रवीण परमार,रो. जगदीश वाघ, रो. राजेश खराटे, रो. प्रबोध पुरोहित, रो चंद्रकुमार डांगे,रो.रणजीत शेवाळे, अमित भोसले, संजीवनी निकम, अमेया वाघ यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment