Friday, June 4, 2021

मुख्याधिकार्यांच्या कष्टाचे झाले चीज..."माझी वसुंधरा'अभियानात सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार कराड नगरपरिषदेला जाहीर...

वेध माझा ऑनलाइन
कराड
माझी वसुंधरा अभियान’ 2 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये राबविण्यात आले. सदर अभियानात नगरपरिषदांच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार कराड नगरपरिषदला जाहीर करण्यात आला आहे असे वृत्त आहे मुखमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कराड पालिकेला अववल विजेता म्हणून उद्याच घोषित करण्यात येणार आहे  मुख्याधिकारी डाके यांच्या प्रयत्नाचे हे यश आहे तसेच त्यांना सहकार्य करणारे पालिकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका व कर्मचारी वर्गाने देखील खूप मेहनत घेऊन ही विजयश्री खेचून आणली आहे अशाही प्रतिक्रिया आता येत आहेत

मागच्या आठवड्यात उठावदार कामगिरी करणाऱ्या पालिका यादीमध्ये कराड पालिकेची निवड झाल्याचे जाहीर झाल्याने येथील पालिकेने ऑनलाइन सादरीकरण देखील केले होते त्यानुसार कराड पालिका अववल घोषित करण्यात आली आहे माझी वसुंधरा स्पर्धेअंतर्गत कराडात वृक्षारोपण, घनकचरा,प्रदूषण, सोलर,आशा विविध उपक्रमांना यशस्वी राबवले होते याची ही एकप्रकारे दखलच घेतली गेली आहे 
स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीत असाच कॉन्फिडन्स ठेऊन माझी वसुंधरा स्पर्धेबाबत मुख्याधिकारी नेहमीच सकारात्मक दिसले त्यांनी पालिकेच्या इतर कामांचाही बॅलन्स आखत माझी वसुंधरा स्पर्धेत टिकून राहण्याचे प्रयत्न सातत्याने ठेवले रात्री उशिरा पहाटे अक्षरशः 4 वाजेपर्यंत येथील पालिकेत थांबून त्यांनी याबाबत काम करत आपल्या कष्टाची बीजे रोवून हे कराडचे अववल स्थान राज्यात निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले हे मान्य करावेच लागेल. त्यांना पालिकेच्या अध्यक्षा उपाध्यक्ष यांचेसह सर्वच नगरसेवक नगरसेविका व कर्मचारी वर्गाची मोलाची साथ मिळाली तसेच शहरातील सामाजिक संस्था व नागरिकांचेही बहुमोल सहकार्य मिळल्यानेच हे यश मिळू शकले अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी डाके यांनी याबाबत बोलताना दिली ...उद्या कराड पालिकेला या स्पर्धेत अववल विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे...

.

No comments:

Post a Comment