Friday, June 18, 2021

जिल्ह्यात सरासरी 28.7 मि.मी. पाऊस आतापर्यंत सरासरी 188.0मि.मी.पावसाची नोंद

सातारा, दि.18जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज शुक्रवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 28.7 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 188.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 41.4(201.9) मि. मी., जावळी- 57.1 (304.5) मि.मी., पाटण-31.9 (251.5) मि.मी., कराड-28.1 (233.7) मि.मी., कोरेगाव-29.2 (135.8) मि.मी., खटाव-11.0 (90.9) मि.मी., माण- 2.7 (59.9) मि.मी., फलटण- 5.5 (69.9) मि.मी., खंडाळा- 13.5 (91.2) मि.मी., वाई-39.9 (195.4) मि.मी., महाबळेश्वर-73.9 (563.2) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. 
  कोयना धरणात आजअखेर 30.00 टीएमसी  (29.97 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 142(585) मि.मी. आहे. 
0000

No comments:

Post a Comment