Saturday, June 12, 2021

सहकार पॅनेलने उच्चांकी दर, मोफत साखर, सुलभ तोडणी यंत्रणा यासारख्या सेवा देत शेतकरी सभासदांना स्थैर्य मिळवून दिले ; डॉ अतुल भोसले

वेध माझा ऑनलाइन
कराड, ता. १२ : कृष्णाकाठच्या सामान्य शेतकरी सभासदांना सहकार पॅनेलने न्याय मिळवून दिला. सहकार पॅनेलचे नेते व कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी उच्चांकी दर, मोफत साखर, सुलभ तोडणी यंत्रणा यासारख्या सेवा देत शेतकरी सभासदांना स्थैर्य मिळवून दिले, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

प्रचार बैठकीत कृष्णा कारखान्याच्या गेल्या ६ वर्षांच्या प्रगती कार्याचा आढावा घेताना डॉ. भोसले म्हणाले, की डॉ. सुरेशबाबांनी गेल्या ६ वर्षात कृष्णा कारखान्याला उर्जितावस्था आणण्याचे काम केले. सन २०१६-१७ सालच्या हंगामात ऊसाला ३२२० रुपये दर दिला. कारखान्याचे आधुनिकीकरण केले. तसेच १२६ कोटींचे मुदत कर्ज फेडून कारखान्याला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने केला. एकरी १०० टन उत्पादन मिळवून देणारी जयवंत आदर्श कृषी योजना राबवून शेतकरी सभासदांना अनेक लाभ मिळवून दिले. अशा कार्यतत्पर सहकार पॅनेलच्या उमेदवारांना शेतकरी सभासदांनी प्रचंड मतांनी विजयी करावे. 

सरपंच हंबीरराव पाटील म्हणाले, की डॉ. सुरेश भोसले यांच्यामुळे वाकुर्डेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. सुरेशबाबांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेची १५ लाखाहून अधिक रक्कम अदा करून, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. तसेच डॉ. अतुलबाबांच्या प्रयत्नामुळे ८१-१९ योजनेचे सूत्र लागू झाले. डॉ. सुरेशबाबांकडे असणाऱ्या विकासाच्या दृष्टीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होणार आहे.

कृष्णा कारखान्याचे सभासद सूज्ञ आहेत. विकासाची त्यांना जाण असून, कृष्णा कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी धडपडणाऱ्या सहकार पॅनेलला हे सभासद मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते वि. तु. सुकरे गुरूजी यांनी व्यक्त केला. 

यावेळी पैलवान धनाजी पाटील, ॲड. दिपक थोरात, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विकास पाटील, दिलीप पाटील, मारूती पाटील, संपतराव पाटील, जगन्नाथ पाटील, सागर पाटील, कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, योगेश पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य वसंत माटेकर, दादासो माटेकर, जयवंत मोहिते, वीरेंद्र पाटील, नेताजी थोरात, माधवराव पाटील यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment