Saturday, June 5, 2021

वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धेमध्ये कराड पालिका राज्यात दुसरी ; 222 पालिकांमध्ये राज्यात अववल...

वेध माझा ऑनलाइन
कराड
भूमी, वायू, अग्नि, जल व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित राज्यातील नगरपालिकांची माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये राज्यातील २२२ नगरपालिकांमध्ये कराड नगरपालिकेने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. शनिवारी ऑनलाईन हा पुरस्कार देण्यात आला. 

मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी हा ऑनलाईन सन्मान स्वीकारला. कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलगदोन वर्ष  प्रथम क्रमांक मिळवला होता.  पालिकेने  शासनाचा वसुंधरा पुरस्कार यापूर्वी मिळवला आहे.

No comments:

Post a Comment