कराड/ येथील नगर पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्या यूवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे गोवारे-चौंडेश्वरीनगर येथे डोक्यात दगड घालून या युवकाचा खून करण्यात आला आहे किरण लादे (वय 27) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही
सबंधित घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोचले. येथील बुधवार पेठेत या खून झालेल्या युवकाचे राहते घर आहे हा युवक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घंटा गाडीवर कामाला होता. नुकताच त्याचा पगारदेखील झाला होता अशी चर्चा आहे खुनाचे कारण व खुन्याचा शोध पोलीस घेत आहेत
No comments:
Post a Comment