Saturday, June 26, 2021

पृथ्वीराजबाबांनी टोचले पटोलेंचे कान ; पृथ्वीराजबाबा म्हणाले ...राज्यातील आघाडी सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल...इंडियन एक्सप्रेस ला दिली मुलाखत...

वेध माझा ऑनलाइन
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कान टोचले आहेत. पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतिक्रिया देताना तीन पक्षांची आघाडी तोडण्याचा काँग्रेसचा कुठलाही विचार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाच वर्षे पूर्णपाठिंबा राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, "तीन पक्षांच्या युतीनं जे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे, ते काँग्रेस तोडणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. भाजपला सरकारबाहेर ठेवण्यासाठी ही आघाडी तयार झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही."

No comments:

Post a Comment