कराड
नगरपरिषदेची निवडणुक लवकरच होणार आहे शहरातील आघाड्या व पक्ष सक्रीय झाले आहेत. पण राजेंद्र यादव यांच्या आघाडीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,लोकशाही आघाडी यांनी कुठल्याही बाबतीत अजिबात विचारात घेतलेले नाही.यामुळे त्यांचा जळफळाट होत असून, गेली साडेचार वर्षे गायब असणारे,नगरपरिषदेच्या कोणत्याही बाबतीत सक्रीय नसणारे राजेंद्र यादव यांची सध्या राजकीय परिस्थिती बरी नसल्यानेच मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळेच ते माझ्यावर नाहक बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांच्या आडमुठेपणामुळे कराड शहराचा अर्थसंकल्प मंजूर झालेला नाही. माझ्यावर आरोप करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,लोकशाही आघाडी यांची सहानभूती मिळवून त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.त्यामुळेच बजेट सारख्या अभ्यासपूर्ण विषयावर यांनी निष्कारण राजकारण सुरु केले असून मी काहीतरी करतोय दाखवण्याचा व्यर्थ व केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे आणि अशा मानसिकतेतून त्यांनी बेताल आरोप करून उपोषणाचा इशारा दिला आहे... असा पलटवार शहराच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी राजेंद्र यादव यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत पत्रकाद्वारे केला आहे...दरम्यान...आम्ही जि उपसूचना दिली आहे त्यानुसारच अंदाजपत्रक लिहले गेले पाहिजे नाहीतर बघा...अश्या प्रकरची दमदाटी कर्माचा-यांना झाल्यामुळे अंदाजपत्रक रखडले त्यामुळे ठेकेदारांना बिले वेळेवर देता आली नाहीत. या सर्वाला राजेंद्र यादव व जनशक्ती आघाडीच कारणीभूत आहे असेही नगराध्यक्षानी या पत्रकात म्हटले आहे....
पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांनी शहराच्या बरेच महिने अडकुन राहीलेल्या बजेटला नगराध्यक्षा सौ शिंदे याना जबाबदार धरत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती व उपोषणाचा इशाराही दिला होता त्याला नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
सौ शिंदे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, नगरपरिषदेचे अंदाजपत्रक हे स्थायी समितीच्या ४ मिटिंग होऊन त्यामध्ये चर्चा करून यांनी मंजूर केले. स्थायी समितीमध्ये १० पैकी ९ सदस्य हे जनशक्ती आघाडीचे आहेत. या सदस्यांनी मंजूर केलेलेच अंदाजपत्रक मा.मुख्याधिकारी यांनी जनरल सभेपुढे सादर केले होते. परंतु सभा सुरु झाल्यानंतर यांनीच स्थायी समितीमध्ये मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची सूचना आम्हाला मंजूर नाही आशी भूमिका घेतली. व या सूचनेवर राजकीय भाषण देऊन काही मुद्दे मांडले. पण लेखी स्वरुपात कोणतीही उपसूचना जनशक्ती आघाडीकडून मिटींगमध्ये दिली गेली नाही. त्यांनी ४ दिवसानंतर तयार केलेली उपसूचना वार्ताहर परिषद घेवून सादर केली. खरे म्हणजे तर उपसूचना हि लेखी स्वरुपात अंदाजपत्रक सभेमध्ये द्यायला पाहिजे होती.
२५ फेब्रु.२०२१ रोजी अंदाजपत्रक सभा झाली मी प्रशासनाला २६ फेब्रु.२०२१ रोजी पत्रे देवून कोणत्याही प्रकारची उपसूचना जनशक्ती आघाडीकडून प्राप्त झाली आहे का ? याची विचारणा केली परंतु याबाबत कोणतीही उपसूचना आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले .त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना १० मार्च २०२१ रोजी पत्रे देवून याबाबतची वस्तुस्थिती कळवली होती या १० मार्चपर्यंत सुद्धा लेखी उपसूचना जनशक्ती आघाडीकडून मिळाली न्हवती. त्यामुळेच मी एकमताने सूचना मंजुरीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला.
अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर राजेंद्र यादव व जनशक्ती आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली, यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी बापट यांनी २५ फेब्रु च्या मिटिंगमध्ये जे झाले आहे त्याचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग, लिहली गेलेली चर्चा या सर्व गोष्टींची पडताळणी करूनच बजेट सादर करावे अशी सुचना केली. त्याप्रमाणे मुख्याधिकारी यांनी संबधित कर्मचा-यांना तशा सूचना केल्या,व त्याप्रमाणे कर्मचा-यांनी लिखाणही सुरु केले,पण जनशक्ती आघाडीतील काही सदस्यांनी नगरपरिषदेच्या तळमजल्यावर असणा-या केबिन पैकी एका केबिनमध्ये संबधित अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेऊन, आम्ही जि उपसूचना दिली आहे त्यानुसारच अंदाजपत्रक लिहले गेले पाहिजे नाहीतर बघा..... अश्या प्रकरची दमदाटी कर्माचा-यांना केली. त्यामुळे सदर प्रक्रिया थांबली व अंदाजपत्रक रखडले त्यामुळे ठेकेदारांना बिले वेळेवर देता आली नाहीत. या सर्वाला राजेंद्र यादव व जनशक्ती आघाडीच कारणीभूत आहे. अंदाजपत्रक हे फेरविचार होऊन परत मिटिंग घेवून त्यामध्ये सादर करण्याची मुख्याधिकारी यांच्याकडे आमची मागणी आहे.
अंदाजपत्रकासंबधी प्रशासनावर व माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आहेत,प्रशासन व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात राजेंद्र यादव यांनी ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग, प्रोसेडींग, मध्ये बदल करण्यात आलेला आहे असा चुकीचा व धादांत खोटा आरोप केला आहे. वस्तुस्थिती पाहता मिटिंग झाल्यानंतर २ ते ३ दिवसातच ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग, लिहली गेलेली चर्चा हे सर्व जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्यात बदल करणे छेडछiड करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.आणि प्रोसेडींग मध्ये खाडाखोड हा फार मोठा गुन्हा समजला जातो, हे मागील अनुभवावरून कराडकराना माहिती आहे. यामुळे माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. आणि यामध्ये नाहक प्रशासनाला खोट्यानाट्या आरोपांचा सामना करवा लागत आहे हे अत्यंत खेदजनक आहे. प्रशासनावर कोण दबाव टाकतय हे यामधून सिद्ध होत आहे.
सध्या जनशक्ती आघाडी कोण चालवत आहे हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या साडेचार वर्षातील आपले अपयश झाकण्याचा,मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा राजेंद्र यादव यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण कराडची जनता हुशार आहे. गावाने तुम्हाला चांगलच ओळखलेल आहे, त्यामुळे तुमच्या या राजकीय स्टंटबाजीचा काहीही उपयोग होणार नाही.राजकीय हेतूने केलेल्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही.जिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहील असेही सौ शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment