Thursday, June 3, 2021

कराडात चक्क पोलिसच "नो एन्ट्री' मधून वाट काढताना कॅमेऱ्यात झाला कैद...नो एंट्रीमध्ये प्रवेश केल्यास जसा सामान्यांना दंड होतो...तसा या पोलिसाला दंड होणार का...? काय कारवाई होणार? शहराचे लक्ष...

वेध माझा ऑनलाइन
कराड
एक म्हण प्रचलित आहे की... दुसऱ्याकडे बोट दाखवताना उरलेली आपल्याकडे वळलेली असतात म्हणजेच... दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचा असेल तर आपण शहाणे नको का...? या म्हणीची आत्ता आठवण आली... त्याचे कारण ही तसेच आहे... .येथील नवग्रह मंदिरासंवर बॅरिगेट्स लावून पोलिसांनी शहरातील वाहतुकीची अडचण करून ठेवली आहे अनावश्यक ट्रॅक ठरवून महत्वाचे रहदारीचे रस्ते पोलिसांनी बंद करून लॉक डाऊन साजरा केला आहे... या ठिकाणी अनेकजण आपल्या सोयीने गडबडीची वेळ बघून या बारिगेट्स मधून रस्ता काढून आपले काम वेळेत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात जे सापडतात त्याना दंडाला सामोरे जावे लागत आहे काल चक्क एक पोलिसच या बॅरिगेट्स मधून रस्ता काढून नो एंट्रीतून गाडी काढताना कॅमेऱ्यात सापडला आता या पोलिसाला किती दंड होणार... आणि तो कोण करणार याची चर्चा कालपासून सुरू आहे...

सध्या लॉक डाऊन असल्याने शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद केले आहेत गर्दी होऊ नये आणि रुग्ण वाढू नयेत अशी त्यामागे शासकीय भावना आहे... पण गेले महिनाभर असच चालू आहे... तरी पेशंट काही म्हणावे असे कमी होत नाहीत ...मग त्यासाठी दुसरी उपाययोजना काय केली पाहिजे याचा शासनदरबारी अजून तरी विचार झालेला दिसत नाही...पर्यायाने या रस्त्यातील बॅरिगेट्स च्या अनावश्यक ट्रॅक ठरवलेल्या रस्त्यावर वाहतूक अडथळत आहे... अनेक वेळा त्याठिकाणी वाद होत आहेत... या बॅरिगेट्स च्या अडथळ्यांनी केरळ मार्गे...दिल्लीला जावे लागत असल्याने तालुक्याच्या ठिकाणाहून महत्वाच्या कामासाठी अलेल्याना किंवा बाहेर गावाहून पेशंट घेऊन आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना गावाला घिरकी घालून त्यांच्या ठिकाणी जावे लागतंय असे चित्र आहे... दिल्ली और कितनी दूर है...?असे हे लोक विचारत दिवसभर इकडून तिकडे रस्ता चुकून-चुकून फिरत आहेत... अनावश्यक फिरणाऱ्याला जरूर फाईन झालाच पाहिजे... मात्र,प्रशासकीय ठरवून दिलेल्या नियमानुसार कामानिमित्त ये ...जा...करणाऱ्याला ही रोजचीच शिक्षा झाली का?...काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकारी याठिकाणी आले असता त्यांचीही गाडी ठरलेल्या निश्चित ठिकाणी जात असताना रस्ता चुकली होती...दरम्यान,काहीजण कामाच्या गडबडीत त्याठिकाणी नो एन्ट्री असूनही दोन बॅरिगेटर्स मधील गॅप मधून घुसून गाड्या काढत आपला रस्ता धरत आहेत...याचे समर्थन होऊ शकत नाही...असे  करणे चुकीचेच आहे...त्यामुळे असे करताना अनेकांना दंड झाला आहे...आणि नियम मोडला तर दंड होणारच हेही तितकेच खरे आहे...मग काल चक्क एका पोलिसाने शनी मंदिर परिसरात असणाऱ्या नो एन्ट्री मधून गाडी काढून नियम मोडला आहे...आणि हा पोलीस नियम मोडताना कॅमेरात कैदही झाला आहे...मग,प्रश्न असा आहे या नियम मोडणाऱ्या जनतेच्या रक्षकाला  दंड होणार का.? त्याच्यावर काय कारवाई होणार?  नियम फक्त सामान्यांसाठीच आहेत का ? याचे उत्तर मिळालेच पाहीजे अशी आता चर्चा शहरात सुरू आहे...

No comments:

Post a Comment