Sunday, June 27, 2021

सहकार पॅनेलला रेकॉर्डब्रेक मतदान करा -देवराष्ट्रे येथील प्रचारसभेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन
देवराष्ट्रे : कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने माणुसकीचा जिव्हाळा जपला आहे. त्यांच्या काळात कृष्णा कारखान्याची मोठी प्रगती झाली असून, शेतकरी सभासदांच्या ऊसाला चांगला दर मिळाला आहे. म्हणूनच उत्तम प्रशासक असणाऱ्या डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला कडेगाव तालुक्यातील सभासदांनी रेकॉर्डब्रेक मतदान करावे, असे आवाहन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, उमेदवार बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, सांगली जि. प. सदस्या शांताताई कनुंजे, सभापती मंगलताई क्षीरसागर, कृष्णा कारखान्याचे संचालक ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या ६ वर्षात अनेक अडचणींतून मार्ग काढत आम्ही कृष्णा कारखान्याला प्रगतीपथावर आणले आहे. येत्या काळात कारखाना एक नंबरला नेण्याचे आमचे उद्दिष्ट असून, याकामी आपल्या सर्व सभासदांचे पाठबळ आवश्यक आहे. यासाठी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे. 

कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की घाटमाथ्यावर संपतराव देशमुख (आण्णा) यांच्यापासून नेहमीच देशमुख कुटुंब आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. पृथ्वीराजबाबा व संग्रामभाऊ यांचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने, सहकार पॅनेलचा विजय निश्चित आहे. 

यावेळी शिवराज जगताप, के. के. मोहिते, शेतकरी संघटनेचे नेते विलास कदम, केशव पाटील, कृष्णत मोकळे, अशोक पाटील,  हणमंतराव जाधव, भारत पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment