Friday, June 11, 2021

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश ; काय राहणार सुरू? काय बंद?...

वेध माझा ऑनलाइन
सातारा
सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा अद्याप ही चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट आहे.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, सद्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दि. 7 जून पासून आदेश जारी केले आहेत ते निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून केवळ शैक्षणिक साहित्य 14 जून पासून सकाळी  9 ते दुपारी 2 या वेळेत घरपोच पुरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरवणाऱ्या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतीतील कामे करण्यासाठी आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी चार वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे.शनिवार व रविवार पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे.शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दूकाने पूर्ण बंद राहणार आहेत.

सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट  11.30 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या  टप्प्यात करण्यात आला आहे.सद्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह निर्बंध कायम ठेवले आले आहेत.
स्तर - 4
- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
- सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
- हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
- अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
- शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
- स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
- कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही
- लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
- राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
- ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
- कृषी कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत  सुरू राहतील.
- ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
- बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही,संचारबंदीचे नियम लागू राहतील

No comments:

Post a Comment