Wednesday, June 23, 2021

कराड पालिकेने प्रीतिसंगम बागेत वावर असणाऱ्या वटवाघलांचा बंदोबस्त करावा ; सातारा जिल्हा मनसेची निवेदनाद्वारे मागणी...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच  वटवाघळापासून निपाह या नवीन पसरत असलेल्या व्हायरसचा धोका उदभवत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे निरीक्षण आहे त्याच पार्शवभूमीवर येथील म न से च्या वतीने प्रीतिसंगम बागेत मोठ्या प्रमाणात वावर असणाऱ्या  वटवाघलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगरपरिषदेकडे केली आहे

महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष ऍड.विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहर अध्यक्ष सागर बर्गे,जिल्हा संघटक नितीन महाडिक,शहर उपाध्यक्ष अमोल हरदास,सतिश यादव यांनी आज या मागणी बाबतचे निवेदन  मुख्याधिकारी रमाकांत डाके याना आज दिले .
 येथील प्रीतीसंगम बागेत फार मोठया प्रमाणात वाटवाघलांचा त्याठिकाच्या असणाऱ्या मोठ्या वृक्षांवर वावर दिसतो. वटवाघलांमुळे अनेक रोग पसरतात असे तज्ञांचे मत आहे. त्यातच आता वाघळांमुळे निपाह या नवीन व्हायरसचा प्रसार होत असल्याचा धोका वैद्यकीय तज्ञ बोलून दाखवत आहेत जिल्ह्यात महाबलेशवर येथे नुकतेच याबाबतच्या झालेल्या परीक्षणात ते स्पष्टही झाले आहे आणि म्हणूनच शहराचे आरोग्य जपण्यासाठी खबरदारी म्हणून येथील प्रीतिसंगम बागेतील वाटवाघलांचा आत्तापासूनच बंदोबस्त पालिकेने करावा अशी मागणी मनसे ने केली आहे....

No comments:

Post a Comment