Thursday, June 10, 2021

कराडात लहान मुलांचे कोविड सेंटर उभारणार ? ; जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचेकडून जागेची पाहणी


वेध माझा ऑनलाइन
कराड
कोरोनाची येणारी तिसरी लाट ही खासकरून लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचे सांगितले जाते यासाठी तत्पूर्वीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकार्याकडून लहान मुलांच्या कोविड सेंटरसाठी येथील 5 ठिकाणांची पाहणी आज करण्यात आली

आज सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कराडात आले यावेळी तहसीलदार प्रांत आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते येथील पंचायत समितीचा हॉल बहुद्देशीय हॉल वेणूताई चव्हाण रुग्णालय मुख्याधिकारी निवास आणि एक ठिकाणी या कोविड सेंटरसाठी विचार चालू आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही केल्या आहेत

No comments:

Post a Comment