Wednesday, June 9, 2021

काही राजकारणी कृष्णा कारखान्यात राजकारण आणू पाहत आहेत...डॉ सुरेश भोसलेंची प्रिथ्वीराजबाबांवर नाव न घेता टीका...सहकार पॅनेलच्या प्रचार शुभारंभावेळी साधला माध्यमांशी संवाद..


वेध माझा ऑनलाइन
 
अजिंक्य गोवेकर
कराड
कृष्णा करखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे त्यानिमिताने आज सहकार पॅनेलने प्रचाराचे रणशिंग फुंकले जयवंतराव भोसले सहकार पॅनल च्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी पॅनल प्रमुख सुरेश भोसले यांनी  माध्यमांशी संवाद साधताना आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता शेलक्या शब्दात निशाणा साधला आमच्या विरोधकांच्यात युती झाली किंवा नाही झाली तरी आम्हाला काही फरक पडत नाही परंतु कारखान्याचे साधे सभासद नसणाऱ्यांनी कारखान्यात राजकारण आणू नये सभासदांना ते आवडणार नाही ही अभद्र युती कारखाना वाटून घेण्यासाठीच होत असल्याचे सभासदांनी आता ओळखलं आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

यावेळी बोलताना डॉ सुरेश भोसले पुढे म्हणाले  सहकारात राजकारण विरहित कारभार अपेक्षित असतो आम्हीदेखील सत्ताधारी विरोधक असा भेदभाव न करता समान न्याय पध्दतीने कामकाज केले आहे मागील निवडणुकीत चुकून म्हणा किंवा आसचऱ्याने पण सहा विरोधक निवडून आले खरतर असे साखर कारखानदारीत सहसा होत नाही पण ते झालं मात्र त्यामुळे अनेकजण मला विरोधकांचा त्रास कामकाज करताना होईल असे सांगत होते पण आम्ही या संपूर्ण कालखंडात त्यांना तोंड उघडायला जागाच दिली नाही कारण आम्ही पारदर्शक कारभार केला सहकार जपला सभासदांना ऊस वेळेवर जाणे,त्या उसाला योग्य भाव मिळणे लिफ्ट च्या योजना  कामगारांचे संरक्षण या प्रमुख बाबी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तसेच परिसरातील चालवल्या जाणाऱ्या संस्थांच्या माध्यमातूनदेखील सामाजिक विकास करण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला यापुढेही तो राहील
आमच्यावर विरोधक कारखान्याबाबतीत खासगीकर्णाचा खोटा आरोप गेली पंधरा वर्षे करत आहेत त्यात तथ्य नाही तसा कधी ठराव केला आहे का हे त्यांनी दाखवावं कारखान्याच्या चांगल्या कारभाराबाबत कसलाही आरोप करता येत नसल्याने त्यांचे असले बिनबुडाचे आरोप सुरू आहेत सभासद त्याकडे लक्ष देत नाहीत असही ते म्हणाले जे सभासद देखील नाहीत ते कारखान्यात राजकारण आणू पाहत आहेत खरतर सहकारात असे करणे चुकीचे आहे सहकाराच्या ड्रीष्टीने हे घातक आहे असे सांगत त्यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली...विरोधकांनी युती केली किंवा नाही केली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही ही युती अभद्र आहे कारखाना वाटून घेण्यासाठीच आहे असा आरोप करत सभासद या प्रवृत्तीना योग्य उत्तर देतील असेही डॉ सुरेश भोसले यावेळी म्हणाले...  

No comments:

Post a Comment