मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? असा सवाल राज्य सरकारला विचारलाय. यावर बोलताना मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागतंच आहे. पण दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहे. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलीय.
राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांबाबत बोलताना राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत घटनेप्रमाणे निर्णय घेतला गेला पाहिजे. पण निव्वळ राजकारण करण्यात काम सध्या सुरु असल्याचं सांगत घटनेची पायमल्ली होत असल्याचा आरोप सांवत यांनी केलाय. त्याचबरोबर राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत. धर्माच्या भावनांशी खेळू नका असं वक्तव्यही सावंत यांनी केलंय.
No comments:
Post a Comment