Wednesday, June 16, 2021

रेकॉर्ड ब्रेक बातमी..."कृष्णा' मधून आजपर्यंत 5000 जण झाले कोरोना मुक्त...

वेध माझा ऑनलाइन
कराड, ता. १६ : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. आज कृष्णा हॉस्पिटलमधून २८ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, दुसऱ्या लाटेतही १७५३ रुग्ण कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे गेल्यावर्षी १८ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने ५०२३ रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. 
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. विश्वास पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 

No comments:

Post a Comment