सातारा (जिमाका)
सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी शिक्षणाच्या कारणास्तव परदेशात जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचे आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करुन आरोग्य विभागाने या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
सातारा जिल्ह्यात सातारा सर्वसाधारण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कराड, उपजिल्हा रुग्णालय, फलटण या ठिकाणी लसीकरण पूर्ण करण्यात यावे. तसेच लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांची माहितीचे रेकॉर्ड अद्यावत करावे. लसीकरण करण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालय प्रमुखांची राहील.
000
No comments:
Post a Comment