Tuesday, February 1, 2022

भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली सामुग्री जप्त; तब्बल 1 हजार जिलेटीन नग सापडले... महापालिका निवडणुक लवकरच होणार असल्याने या घटनेने मुंबईत खळबळ...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईसह, ठाणे आणि  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. पण, त्याआधीच भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली सामुग्री जप्त करण्यात आली आहे. तब्बल 1 हजार जिलेटीन आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  
भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीनाका इथं ही कारवाई करण्यात आली आहे.   अल्पेश पाटील, पंकज चव्हाण, समीर वेडगा अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहे.
पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून 1 हजार जिलेटीन नग, 1 हजार डीटोनेटर नग आणि इको कार जप्त केली आहे. स्फोट घडवून आणण्याची सुमारे साडेचार लाख रुपयांचे स्फोटक सामुग्री जप्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, मुंबई महापालिका, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं कुणी आणली, या मागे कुणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment