Wednesday, February 2, 2022

भाजप आमदार नितेश राणे यांना जबरदस्त धक्का ; राणेंना अखेर अटक ; न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी...

वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार नितेश राणे  यांना शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी अखेर अटक करण्यात आली आहे. कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राणे कुटुंब आणि भाजपसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. कारण नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडून कोर्टात नितेश यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. नितेश हे मुंबई हायकोर्टाच्या सूचनेनंतर आज कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात हजर झाले होते. तिथे त्यांनी शरण अर्ज दाखल केला होता. नितेश हे स्वत:हून शरण आल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी नितेश यांच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती. कोर्टाने सुरुवातीला त्यांची मागणी ग्राह्य धरली होती. पण सरकारी वकील प्रदीप घरात यांनी नितेश यांच्या पोलीस कोठडीची  मागणी केली. जवळपास दोन तास चाललेल्या युक्तीवादानंतर अखेर कणकवलीच्या दिवाणी न्यायालयाने अंतिम निर्णय जाहीर केला. या प्रकरणात पोलिसांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीबाबत सबळ पुरावे दाखविल्याने न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment