वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. अशात महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटलं आहे की, पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं आहे. हे का केलं आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सला अशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली आहे, असं टोपे म्हणाले.
आता निर्बंध कमीच केले जातील
राजेश टोपे म्हणाले की, आता निर्बंध वाढवण्याचं काहीही कारण नाही. आता निर्बंध कमीच केले जातील. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तसा विश्वास दिला आहे. महाराष्ट्र आजच मास्क मुक्त केला पाहिजे असं अजिबात नाही मात्र ज्यांनी मास्क मुक्त केलं त्यांचं शास्त्र काय याचा अभ्यास करत आहोत. तूर्त मास्क मुक्तीचा विषय नाही, असंही टोपे म्हणाले.
No comments:
Post a Comment