Sunday, February 6, 2022

कार्वे नाका परिसरातील सार्वजनिक मुतारीची दुरावस्था..नागरिकांची गैरसोय: तक्रारी...

वेध माझा ऑनलाइन - कार्वे नाका नजीक भेदा चौक ते कार्वे नाका परिसरातील  पाण्याच्या टाकीजवळच असणाऱ्या सार्वजनिक मुतारीची अक्षरशः दुरावस्था झाली असून यासंदर्भात परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत कराड पालिकेने कार्वे नाका परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी व या समस्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

कराड शहरातील कार्वे नाका हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात रहिवासी क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक आहेत. मात्र या परिसरातील पाण्याच्या टाकीखाली फक्त एकच सार्वजनिक मुतारी आहे.परंतु या मुतारीची खूप दुरावस्था झाली असून या मुतारीतुन बाहेर लोट वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत  विशेषतः या परिसरात फक्त एकच पुरुषांसाठी मुतारी आहे आणि तिची अशा प्रकारची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
तसेच कार्वे नाका परिसरात अनेक महिला व्यवसायिक आहेत. त्यांच्यासाठीही स्वतंत्र सार्वजनिक मुतारीची सोय व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाण्याच्या टाकीखालील या दुरावस्थेत असलेल्या सार्वजनिक मुतारीचीही किमान स्वच्छता तरी करावी अशी मागणीही जोर धरत आहे.

No comments:

Post a Comment