वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस पक्षाकडून देशभर सदस्य नोंदणी अभियान डिजिटल माध्यमातून राबविले जाणार आहे. या अभियानाचा प्रारंभ कराड दक्षिण काँग्रेस मध्ये आजपासून राबविला जाणार आहे. या अभियानाचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अल्पना यादव, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काँग्रेस पक्षाने देशातील जनतेला एकसंघ ठेवण्याचे काम केलेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीवेळी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा उभारण्यासाठी देशातील सर्व जनता काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्र आली होती. तोच एकसंघ विचार काँग्रेसने आजपर्यंत जपला म्हणूनच आज आपला देश विविधतापूर्ण आहे. इंग्रजांनी आपला देश लुटून नेल्यानंतर तो समृद्ध करण्यासाठी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी धोरणात्मक निर्णय घेत प्रयत्न केले. त्यानंतरच्या काँग्रेसच्या सर्व नेतृत्वांनी आपल्या देशास समृद्ध करीत देशातील जनतेला एकसंघ ठेवले. परंतु आता जातीयवादी पक्षांचा देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील जनतेला एकसंघ ठेवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविणार असून त्याची व्याप्ती बूथ लेवल पासून केली जात आहे. आपल्या बूथ मधील जनतेला काँग्रेसचा विचार पटवून देत सदस्य नोंदणी केली त्याचा परिणाम कायम राहणार आहे. फक्त मोठे आकडे दाखविण्यासाठी हि नोंदणी नसून एक समृद्ध विचार वाढविण्यासाठी हि सदस्य नोंदणी आहे. तरी, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपल्या मतदारसंघात हे अभियान यशस्वी करूया.
यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बूथ लेवल पर्यंत काँग्रेसचे नोंदणी प्रतिनिधी म्हणून महिलांची संख्या लक्षणीय असून काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मध्ये मोठा सहभाग महिला घेत आहेत. यावेळी जि प सदस्य उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले तर आभार कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment