Thursday, February 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लिबर्टी मैदानात साजरा ; रणजित पाटील, रामकृष्ण वेताळ ऍड उदय पाटील यांनी केक कापून वाढदिवस केला साजरा ; उपस्थितांचा मैदानात टाळ्या वाजवून भव्य प्रतिसाद ;

वेध माझा ऑनलाईन - रणजित पाटील मित्र परिवाराच्या वतीने गेले 5 दिवस कराडच्या लिबर्टी मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी सामने सुरू आहेत आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे तसेच आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसही आहे त्याचनिमित्ताने लिबर्टी मैदानात मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे

यावेळी रणजित पाटील सचिन पाटील ऍड उदय दादा पाटील माजी नगरसेवक फारुख पटवेकर 
मानसिंग पाटील अरुण जाधव तसेच भाजपाचे कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ कालिकादेवी पतसंस्थेचे मुनिर बागवान जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील (दादा) संजय थोरात दादासो पाटील काशिनाथ चौगुले रमेश जाधव राजेंद्र जाधव राजेंद्र पवार जितेंद्र जाधव बाळासाहेब मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते

रणजित( नाना) पाटील भाजप नेते रामकृष्ण वेताळ व उदय दादा पाटील उंडाळकर यांनी यावेळी केक कापून सर्व उपस्थितांना हस्तांदोलन करत हॅपी बिर्थडे टू यू... या गीतावर टाळ्यांचा गजर केला यावेळी येथील माहोल पूर्ण बदलून गेला होता रात्री 9 चा सुमार असूनही संगीताच्या ठेक्यावर लोकाची उपस्थिती टाळ्यांच्या गजरात या वाढदिवस सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसली
रणजित पाटील मित्र परिवाराच्या वतीने गेले 5 दिवस कराडच्या लिबर्टी मैदानावर कबड्डी सामने सुरू आहेत आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे तसेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसही आहे याचनिमित्ताने रणजित (नाना)पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस लिबर्टी मैदानात आज मोठया उत्साहात साजरा केला

 

No comments:

Post a Comment