वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपालिकेचे वीज बिल थकल्याने महावितरणने आज सायंकाळी सोमवारी कराड नगरपालिकेच्या मुख्य वारूंजी जॅकवेलचा वीजपुरवठा तोडला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून मंगळवारी सकाळचा पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कराड नगरपरिषदेच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी वारुंजी येथील मुख्य जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो महावितरणची त्यासाठीची यावर्षीची बिले अद्याप नगरपालिकेने दिली नसून त्याची रक्कम लाखों रुपयात असल्याचे समजते दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी वारुंजी जॅकवेलचे विद्युत कनेक्शन तोडले. त्यानंतर पाण्याच्या शुद्धीकरणासह सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे शहरात एकूणच या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त होत होतो आहे
No comments:
Post a Comment