वेध माझा ऑनलाईन - कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात डॉ अतुलबाबाना यापुढे भाजप कडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथील कृष्णा मेडिकल कॉलेजच्या एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमाशी बोलताना दिली ... मग प्रश्न असा आहे की...यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपने अतुलबाबांना म्हणावे असे सहकार्य केले नाही असे विखे-पाटलांना सुचवायचय का...? अतुलबाबांनी यापूर्वी दोन वेळा भाजप कडून निवडणूक लढवून ते त्यात पराभूत झाल्यानंतर आता भाजप नेते म्हणत असतील की त्यांना यापुढे ताकद दिली जाईल...मग यापूर्वी त्यांना मदत करायला भाजप कुठे कमी पडली ? की, ज्यामुळे त्यांचा पराभव झाला...? हेही विखे पाटलांनी खरतर यावेळी स्पष्ट सांगायला हवे होते... मगच यापुढे मदत करू असे म्हणायला हवे होते...केवळ यापुढे सहकार्य करणार असे म्हणून त्यांनी अपुरे स्टेटमेंट करत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले... त्यांना यातून नेमकं काय सुचवायचं याची चर्चा आता सुरू आहे
दरम्यान ते पुढे म्हणाले सत्यजित तांबे भाजप च्या मदतीने विजयी झाले आहेत त्यांनी थेट भाजप मधे प्रवेश करावा अशी अनेक कार्यकर्त्याची अपेक्षाही आहे तांबे निवडून आल्यावर त्यांनी फडणवीस यांचे आभारही मानले आहेत
बाळासाहेब थोरात यांनी नुकताच काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे यावरून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असताना ते खिंड सोडून पळाले असे सांगत विखे-पाटलांनी थोरात यांच्यावर आज टीका केली काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले विखे पाटील याना काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नासंबंधी बोलण्याचा अधिकार अजिबातच नसताना काँग्रेसच्या अंतर्गत बाबीबद्दल ते बोलून बसले... थोरात यांनी काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे हा त्यांचा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे परंतु विखे-पाटील यांनी याविषयी सुद्धा टीका करत काँग्रेस सहित बाळासाहेब थोरात यांनाच टार्गेट करण्याचा आज विनाकारण प्रयत्न केला त्यामुळे या विषयाबाबत काँग्रेस आणि थोरात यांच्याकडून त्यांचा लवकरच समाचार घेतला जाणार हे मात्र यानिमित्तान नक्की झालं !
No comments:
Post a Comment