वेध माझा ऑनलाइन - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचं आज दुबईच्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. परवेज मुशर्रफ यांच्या निधनाबद्दल पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीकडून माहिती देण्यात आली आहे.त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून दुबईमध्ये उपचार सुरू होते. दीर्घ आजारपणामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहेत परवेज मुशर्रफ?
परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच ते निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील आहेत. 1999 साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना त्यांनी भारताविरूद्ध कारगील युद्ध पुकारले, मात्र या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. या युद्धाची कल्पना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देण्यात आली नव्हती. यावरून परवेज मुशर्रफ आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले.
No comments:
Post a Comment