Wednesday, February 8, 2023

सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा ; कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी दिली अचानक भेट ; पाटील बंधूनी केले जोरदार स्वागत ;


वेध माझा ऑनलाईन - कराडमध्ये युवा नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे इथं येऊन पाहिलं आणि मी अक्षरशः भारावून गेलो आहे...  इथलं वातावरण पहायला मिळाल त्याच समाधानही आहे... संपूर्ण राज्यभरातुन या स्पर्धेत खेळाडू भाग घेत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे... सर्वाना शुभेच्छा देतो... अस म्हणत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी कराडात चाललेल्या कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी आजच्या सायंकाळी भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या


कराडात पोलीस मार्च झाल्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी एस पी शेख येणार आहेत अशी माहिती मिळाली अचानक काही वेळात त्यांची लिबर्टी ग्राउंडवर दमदार एन्ट्री झाली त्यांचे स्वागत रणजित पाटील सचिन पाटील फारुख पटवेकर भानुदास वास्के तसेच लिबर्टी च्या अनेक सदस्यांनी केले त्यानंतर एस पी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
दरम्यान सचिन पाटील रणजित पाटील यांनी एस पी शेख यांचे जोरदार स्वागत केले शेख यांनी सामन्याच्या ठिकाणी जाऊन खेळाडूंना बेस्ट-लक देत टॉस केला व सामन्याला सुरुवात करून देत त्याठिकाणी सामना पाहण्याचा काहीकाळ आनंद लुटला काहीवेळानंतर ते पुढील कामासाठी सर्वांची रजा घेऊन निघून गेले

No comments:

Post a Comment